जळगाव । राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याकडून आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
खरंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. यापार्श्वभूमीवर जळगावसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला देखील जारी केला आहे. आणि मंगळवारी आणि उद्या बुधवारी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र काल सोमवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
हवामान खात्याने आज जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. तर नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट दिला आहे.