---Advertisement---

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; अशोक चव्हाण भाजपमध्ये करणार प्रवेश ?

---Advertisement---

Maharashtra politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. तर ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याआधी शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले आणि भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. आता राज्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. अशोक चव्हाण आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment