जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 9 जानेवारीपर्यंत जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी देखील करण्यात आला आहे. येत्या 3 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी हलक्या पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 7 जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
6 Jan, येत्या 4 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाची/ ढगाळ आकाशाची शक्यता.
IMD pic.twitter.com/o7gY4OUJtd— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 6, 2024
जळगाव जिल्ह्यात 9 जानेवारीला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फुकट जाण्याची चिंता त्यांना सतावत आहे.