---Advertisement---

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; गायीच्या दुधाला मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा प्रतिलिटर दर

---Advertisement---

मुंबई : राज्यात दूधाला किमान भाव मिळावा, दूधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दूधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात दुग्ध विकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानुसार सहकारी आणि खासगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चित करण्यासाठी शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली होती.

सहकारी आणि खासगी दूध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या सदर समितीने राज्य सरकारला केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गायीच्या दूधासाठी (३.५/८.५) गुणप्रतिकरीता किमान खरेदी दरास मान्यता देतानाच सदरचे दर विनाकपात दूध उत्पादक शेतकरी यांना अदा करणे अभिप्रेत राहील, असा निर्णय घेण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

दूधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत सरकारला शिफारस करण्यात यावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, सरकारकडून प्राप्त निर्देशानुसार ३ महिन्यापूर्वीही समितीने दूध दराबाबत सरकारला शिफारस करावी, किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत सरकारला दरमहा अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment