राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ, किती रुपयांची झाली वाढ?

मुंबईः शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने आज मंगळवारी अध्यादेश काढून मानधनाबाबत आदेश काढले आहेत.

राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मानधन वाढीसंदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

माध्यमिक शिक्षण सेवकांच्या वेतनामध्ये ८ हजार रुपयांवरुन १८ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांचं वेतन ९ हजार रुपयांवरुन २० हजार रुपये करण्यात आलेलं आहे.