मुंबई । राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कधी जून-जुलैमध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं- पीकांचं मोठं नुकसान होतं. तुमच्याही पिकांचं नुकसान झालं असेल तर सरकारकडून देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. शासनाने एसडीआरएफ नियमात बदल करून प्रति हेक्टर मदत वाढण्याचा आदेश काढला आहे
बागायती पीकांच्या नुकसानीसाठी आधी प्रति हेक्टरी 17 हजार रूपये नुकसान भरपाई दिली जात होती. आता ती वाढवण्यात आलाी आहे. 27 हजार प्रतिहेक्टर ही मदत सरकार देणार आहे. ही नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे.
जिरायती जमीन जर तुम्ही पीक घेतलं असेल. त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल. तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आधी प्रति हेक्टरी मर्यादा 8 हजार रूपये मदत शेतकऱ्यांना मिळत होती. आता ती 13 हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मर्यादा दोन हेटक्टर पर्यंत असणार आहे. बहुवार्षिक पीक नुकसान झालं असेल. तर त्यासाठी आधी प्रति हेक्टरी 22 हजार 500 रूपये मदत सरकारकडून दिली जायची ती आता वाढवली गेली आहे. आता 36 हजार प्रति हेक्टर अशी ही मदत दिली जाणार आहे. 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानासाठी ही मदत दिली जाईल.