मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ करणारी एक बातमी आहे. सोळा वर्षापूर्वीच्या प्रकरणात निलंगा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे आता त्यांना निलंगा कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
2008 मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोड येथे महामंडळाची बस पेटवली होती. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये राज ठाकरेंच्या नावाचाही समावेश होता. तत्पूर्वी निलंगा कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा न्यायालयात हजर राहावे लागले. कारण प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे त्यांना शक्य नव्हते. त्यावेळी त्यांना जामीनही मिळाला होता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तारखेला हजर न राहिल्याने कोर्टाने पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
या प्रकरणात इतर आरोपींचा जामीन ही कोर्टाने रद्द केला होता. नंतर पुन्हा दंड लावत त्यांना रितसर जामीन मिळाला होता. पण राज ठाकरे हे तारखेला हजर राहात नसल्याने त्याच्याविरोधाच वॉरंट काढण्यात आलेय. आता राज ठाकरे यांनी न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे.