राज ठाकरे महायुतीत सामील होणार ? वाचा काय म्हणाले गुलाबराव पाटील ?

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांआधी महायुतीत (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) सहभागी होतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी देखील राज ठाकरे हे महायुतीत आले तर आम्हाला आनंदच होईल, असे मत व्यक्त केले आहे.

काय म्हणालेय गुलाबराव पाटील ?
राज्याला हिंदुत्व ठाकरेंनी दिले आहे. त्यामुळे आम्ही हिंदुत्वाच्या विचाराने एकच आहोत. राज ठाकरे हे महायुतीत आले तर आम्हाला आनंदच होईल, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगावात ते पत्रकारांशी बोलत होते.