रानभाजी महोत्सव ! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट

पाचोरा : जळगाव येथे आयोजित रानभाजी महोत्सवात पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. कार्यक्रमाकरिता राणीचे बाँबरुड येथील युवा शेतकरी मयूर वाघ, गाळण येथील प्रगतशील शेतकरी अर्जुन पांडुरंग पाटील यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शेतकऱ्यांनी फांग,गवती चहा, आंबट चुका,आंबट चुका, कटोरले, शेवग्याच्या शेंगा, अशा विविध प्रकारच्या रानभाजी विक्रीसाठी आणलेल्या होत्या.

कार्यक्रमास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक श्री चलवदे , म जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव कुरबान तडवी , प्रकल्प संचालक जाधवर , तंत्र अधिकारी दीपक ठाकूर, जळगाव तहसीलदार शितल राजपूत यांनी पाचोरा तालुका स्टॉल ला सदिच्छा भेट दिली.

स्टॉल भेटी दिली व युवा शेतकरी मयूर यांनी वाघ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव यांच्याशी चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना गवती चहा भेट म्हणून देण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी गवती चहाचे उत्पन्न वाढीकरिता प्रयत्न करण्याची गरजेचे असल्याचे सांगितले.