---Advertisement---

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नंदुरबारातील ‘या’ तिघांना निमंत्रण

---Advertisement---

नंदुरबार : अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अक्कलकुवा तालुक्यातील तिघांना उपस्थितीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तशा आशयाची निमंत्रणपत्रिका अक्कलकुवा तालुक्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुरेश जैन यांच्या हस्ते देण्यात आली. २० जानेवारीपर्यंत त्यांना अयोध्याला पोहोचावे लागणार आहे. २२ जानेवारी रोजी ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण अक्कलकुवा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील भाथीजी महाराज संप्रदायाचे प्रमुख अजबसिगजी महाराज, शबरीमाता मंदिराचे प्रमुख तथा रामानंद संप्रदायाचे आचार्य करमसिंग महाराज (अंधारबारी) व रतनबारा येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रवचनकार प्रताप वसावे यांना निमंत्रण आले आहे. यावेळी विश्व हिंद परिषद जळगाव ललित चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाप्रमुख विजय सोनवणे, श्याम गावित नवापूर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment