रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरण; एनआयएला मिळाले मोठे यश

xr:d:DAFtd8oCXa8:2638,j:1074533130935638554,t:24041208

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. याप्रकरणी एनआयएने कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एकाचे नाव अब्दुल मतीन ताहा आहे तर दुसऱ्याचे नाव मुसावीर हुसेन शाजेब आहे. दोघांच्या अटकेनंतर एनआयएने एक निवेदन जारी केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, शाजेब हा स्फोटातील मुख्य आरोपी आहे. त्यानेच कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता.

तर, ताहा हा या स्फोटाचा सूत्रधार होता. या स्फोटाची संपूर्ण योजना त्यांनीच तयार केली होती. तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, शाजेबनेच स्फोटके कॅफेमध्ये नेली होती. या दोघांचा शोध घेण्यासाठी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि यूपीमधील 18 ठिकाणी छापे टाकले होते. या दोघांवर एनआयएने प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.