---Advertisement---

रावेरात पूराचे थैमान : माजी उपनगराध्यक्षांचा तीन दिवसानंतर मृतदेहच हाती

---Advertisement---

रावेर  : माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे पुराच्या पाण्यात बुधवारी वाहून गेल्यानंतर तब्बल तिसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आसराबारी येथील खदाणीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने शहरात शोककळा पसरली. सातपुडा पर्वतरांगात झालेल्या मुसळधार पावसाने रावेर शहरातील दोघांचा मृत्यू ओढवला होता तर सुधीर पाटील पुरात बेपत्ता झाले होते मात्र शोध सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृतदेहच हाती आला.

पुराच्या पाण्याने घेतला तिघांचा बळी
बुधवारी रात्री सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला. नदीच्या पुराच्या पाण्यात मोरव्हाल, ता.रावेर येथील बाबूराव रायसिंग बारेला (40) हे वाहिल्यानंतर त्यांचा गुरुवारी मृतदेह हाती आला तर रावेरातील नागझिरी नदीला पावसामुळे पूर आल्याने रावेर शहरातील नदीकाठी वास्तव्यास असलेल्या ईकबाल कुरेशी (50) यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यानंतर पुराच्या पाण्याने भिंत अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू ओढवला तर तिसर्‍या घटनेत रावेर येथील माजी नगरसेवक सुधीर पाटील हे नागझिरी नदीवरील पुलावरून दुचाकीवरून जात असताना वाहून गेल्यानंतर तब्बल 36 तासानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता त्यांचा मृतदेह आसराबर्डी भागातील खदाणीत हाती लागला. तहसीलदार बंडू कापसे, रावेरचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी यासीन तडवी, तलाठी स्वप्नील परदेशी, गुणवंत बारेला आदींसह स्थानिक पदाधिकार्‍यांनी माजी नगरसेवकासाठी शोध मोहिम राबवली.

145 घरांचे नुकसान
रावेरसह खिरोदा प्र.रावेर, रमजीपूर, रसलपूर, शिंदखेडा भागातील नदी काठच्या 145 घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसोरोपयोगी साहित्याचे नुकसान झाले तर घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. पावसामुळे दहाहून अधिक गुरे वाहून गेल्याची भीती आहे. खिरोदा जिल्हा परीषद शाळेसह तलाठी कार्यालयात पावसाचे पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---