रावेर : तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी निलेश चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी उर्मिलाबाई पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संघाच्या सभागृहात झाली. चेअरमनपदासाठी निलेश साहेबराव चौधरी तर व्हा. चेअरमनपदासाठी उर्मिलाबाई चंद्रकांत पाटील यांचे प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एफ. आय. तडवी यांनी काम पाहिले त्यांना व्यवस्थापक विनोद चौधरी यांनी सहकार्य केले. बैठकीस संचालक किशोर पाटील,रमेश पाटील,जिजाबराव चौधरी,यशवंत महाजन, सिताराम महाजन,लक्ष्मण मोपारी,सुरेश पाटील,पुरुषोत्तम पाटील,नितीन पाटील,निळकंठ चौधरी,ज्ञानेश्वर धनगर, ,नयना पाटील , बिसन सपकाळ उपस्थित होते.
यावेळी छोटेखानी सत्कार समारंभ झाला. यात संघाचे नवनिर्वाचित चेअरमन निलेश चौधरी आणि व्हा. चेअरमन उर्मिलाबाई पाटील यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी चेअरमन पी. आर. पाटील, माजी कृऊबा सभापती अर्जुन पाटील,बाजार समिती संचालक मदार पाटील पितांबर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आत्माराम कोळी, माजी पस सदस्य योगेश पाटील, चंद्रकांत पाटील यांनी करुन अभिनंदन केले.