---Advertisement---

रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटलांचा भाजपात जाहीर प्रवेश

---Advertisement---

जळगाव । आगामी निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसे राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहे. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची अनेक वर्षाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. यातच आता रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुबई येथील भाजपा कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीराम पाटील अपक्षातून लढणार होते. याबाबतची घोषणाही केली गेली होती. मात्र सध्या राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी होत असून यात भाजपात जाणाऱ्या नेते मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

यातच गेल्या अनेक दिवसांपासून श्रीराम पाटील हे भाजपच्या वाटेवर होते. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी प्रा. गोपाळ दर्जी यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment