कर्क : या राशीच्या लग्न स्थानात दोन्ही शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे या काळात आत्मविश्वास दुणावलेला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुमच्या बाजून निकाल येऊ शकतो. बँकिंग, आयात निर्यात क्षेत्रात लाभ दर्शवत आहे. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. अडकलेली सर्व कामं मार्गी लागतील अशी स्थिती आहे.
वृश्चिक : या राशीच्या पाचव्या स्थानात ही युती होत आहे. विपरीत राजयोगामुळे आत्मविश्वासात फरक दिसून येईल. त्यात सूर्याचं पाठबल असल्याने फायदा होईल. बुधादित्य योगामुळे काही अशक्यप्राय कामं पूर्ण करता येतील. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. आध्यात्मात या काळात रुची वाढेल. संशोधक वृत्ती या काळात वाढलेली दिसून येईल.
मकर : कर्क राशीत बुध आणि सूर्य एकत्र येत असल्याने या राशीच्या सातव्या स्थानात योग तयार होत आहे. त्यामुळे भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच पत्नीकडून उत्तम साथ लाभेल. आत्मविश्वास वाढेल, तसेच कामाचा वेग वाढेल. जुनं कर्ज फेडण्यासाठी योग्य वेळ आहे. शत्रू पक्षावर हावी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी ‘तरुण भारत लाईव्ह’ केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘तरुण भारत लाईव्ह’ कोणताही दावा करत नाही.)