मेष, गुरू मे महिन्यापर्यंत मेष राशीत राहील, यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मे महिन्यापर्यंत मेष राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप खास असू शकतं. समाजात त्यांचा मान-सन्मान वाढेल, संपत्ती वाढेल. संपत्ती वाढल्याने रखडलेली कामं पुन्हा सुरू होतील. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
कर्क, वर्षाच्या सुरुवातीला गुरु कर्क राशीच्या दशम भावात असेल, त्यामुळे नववर्षात कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल. अध्यात्माकडे कल वाढेल. यासोबतच या राशीच्या पाचव्या भावात शुक्र आणि बुधही असतील, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
वृश्चिक, वर्षाच्या सुरुवातीला सूर्य देवासोबत मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात असेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. यासोबतच शुक्र आणि बुध देखील तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात. करिअरबद्दल बोलायचं झालं तर, या वर्षी तुम्हाला घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीत तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.
कुंभ, या राशीमध्ये गुरू तिसऱ्या स्थानी असेल, यासोबतच शनिदेव वर्षभर तुमच्या राशीत राहणार आहे. यामुळे तुमच्या प्रत्येक कामादरम्यान तुमच्यावर शनिची कृपा असेल आणि त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल.