तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ मे २०२३ । आज तीन राशीच्या लोकांसाठी महत्वाचा दिवस आहे. तुमची राशीही यात आहेत का? जाणून घ्या.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांना आज राजकारणात केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. व्यवसायात आज नवीन करार मिळाल्याने तुमचा नफा आणि प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन रास
मिथुन राशीचे ग्रहनक्षत्र सांगत आहेत की, आज तुम्ही तुमच्या कामात गंभीर आणि सतर्क राहा. निष्काळजीपणामुळे कामावर परिणाम होईल. विद्यार्थ्यांना आज स्पर्धेत यश मिळाल्याने आनंद होईल. प्रेम जीवनात आनंददायी अनुभूती येईल आणि संवादाने समस्या सुटतील. संध्याकाळी तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल आणि तुम्हाला काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही मिळेल.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांना आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीने तुमची दीर्घकालीन समस्या दूर होईल. आईचे आशीर्वाद घ्या, मुलीला मिठाई खायला द्या.