राष्ट्रपती राजवट… फडणवीस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अनेक विषयांवर आपली भुमिका मांडली. 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवार यांची असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अजित पवार सोबत आले तेव्हा शरद पवारांची यात काय भूमिका होती, ते सांगितले.
फडणवीस म्हणाले, “विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रपती राजवट लावण्याची कल्पना ही शरद पवारांची होती. मी इतक्या लवकर भूमिका बदलू शकत नाही. राष्ट्रपती राजवट लागल्यावर राष्ट्रवादीलाही लेटर देण्यात आलं. हे राष्ट्रवादीचं लेटर माझ्या घरात तयार झालं. त्यावर त्यांनी सही केली. जेव्हा आमच्यासोबत शिवसेनेनं विश्वासघात केला तेव्हा पवारांनी आमच्यासोबत बातचीत केली. ते सरकार बनवण्यासाठी तयार होते.”
“बदला पूर्ण केला असं मी म्हणालो. पण आता मी म्हणतो की, बदला घेणं योग्य नाही. लोकांचा अधिकार ठाकरे गटाचे प्रमुख ऊद्धव ठाकरेंनी हिरावला. आमची शरद पवारांसोबत कोणतीच बातचित नाही. आम्हाला संधी मिळाली आम्ही राजकारण केलं. तुमचा पक्ष का फुटतो? तुम्ही फुटू देऊ नका? अजित पवारांच पारडं जड आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केस जास्त मजबूत आहे. उद्धव ठाकरे अफवा पसरवत आहेत की हे 16 आमदार बाद होतील.” अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढू. राज्यात मुख्यमंत्री बदलणार नाहीत. अजित पवारांना बनवायची वेळ आली तर त्यांना 5 वर्षांसाठी बनवू. भाजपच येत्या निवडणुकीत नंबर वन पार्टी बनेल. निर्णय पंतप्रधान घेतात, कुणाचं काय होणार? हे संसदीय बोर्ड ठरवेल. पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन, मुंबईत थांबेन किंवा नागपूरला ही जाण्याची तयारी आहे. पतंगबाजीत काहीच महत्त्व नाही. राज्यात मी पुन्हा सरकार आणणार.” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.