राष्ट्रवादी पक्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले वाचा..

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल निर्णय दिला असून त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल आहे. यापुढे अजित पवार गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाने अर्ज करायला सांगितला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले फडणवीस?
“हा अपेक्षित निर्णय आहे, कारण मागील अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, समाजवादी पार्टी संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात इलेक्शन कमिशनची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे” अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो निर्णय लोकशाहीत महत्वाचा असतो. वेळोवेळी पार्टीचे संविधान कसं होत? निवडणुका झाल्या की नाही? आता पक्ष कोणाचा आहे? याचा विचार झाला आहे” असं देवेद्र फडणवीस म्हणाले. “2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला, त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. लोकशाहीने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. चपराक वैगेरे मी म्हणत नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.