---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, काय प्रकरण?

---Advertisement---

धुळे : दोन दिवसांपूर्वी कचरा ठेकेदारावर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे झालेल्या शाई फेक प्रकरणात राष्ट्रवादीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

Dhule NCP News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कचरा ठेकेदाराच्या कार्यालयामध्ये पोहोचून संबंधित ठेकेदारावर शाई फेकून एकच गोंधळ केला होता. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

माजी आमदार गोंटेंचे पत्रक

शाईफेक आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नसल्याचे म्हणत या प्रकरणाशी राष्ट्रवादीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment