राहुलने निवड केली वायनाडची, अमेठी-रायबरेलीबाबत गांधी परिवार काय निर्णय घेणार ?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 मध्ये राहुल अमेठीमधून निवडणूक हरले, पण वायनाडमधून विजयी झाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा वायनाडची निवड केली असली तरी  रायबरेली आणि अमेठीच्या जागांवर काँग्रेसने मौन बाळगले आहे.

रायबरेली-अमेठी ही जागा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानली जाते, पण काँग्रेसने अद्याप दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत. अशा परिस्थितीत 2024 मध्ये गांधी परिवार या दोन जागांवर निवडणूक लढवणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण उमेदवारी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जागांवर अद्याप उमेदवार जाहीर न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रायबरेली आणि अमेठीच्या जागांबाबत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्येही चर्चा होत नसल्याने त्याचा निर्णय गांधी कुटुंबावर सोपवण्यात आला आहे. राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी दिल्यानंतर त्यांना अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणे कठीण जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.