राहुल गांधींनी कार्यकर्त्याला खाऊ घातले कुत्र्याच्या तोंडात… पहा व्हिडिओ

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत आहेत आणि जेव्हा कुत्र्याने खाल्लं नाही तेव्हा त्यांनी ते बिस्किट एका कार्यकर्त्याला दिलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते राहुल गांधींवर टीका करत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर ट्विट केले आणि कुत्र्याने जेवले नाही तेव्हा त्यांनी तेच बिस्कीट आपल्या कार्यकर्त्याला दिले. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे वागवत असतील, तर असा पक्ष नाहीसा होणे स्वाभाविक आहे.”

भाजपने म्हटले की, “वाह राहुल गांधी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जेव्हा कुत्र्याने बिस्किट खाल्लं नाही, तेव्हा राहुलजींनी तेच बिस्किट त्यांच्या एका कार्यकर्त्याला खाऊ घातलं.

बघा… तुमच्यासारख्या नेत्यांना प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले त्या कार्यकर्त्यांची आम्हाला दया येते. आणि तुम्ही त्यांना कुत्र्याला बिस्किटे खायला देत आहात?”