‘राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत’, वडेट्टीवारांना तातडीनं बोलावलं दिल्लीत?

मुंबई : राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांना दिल्लीत बोलवण्यात आलं आहे. यावेळी वडेट्टीवार काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. अशी माहिती मिळते आहे.
राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजकारणात प्रवेश करावा. राष्ट्रभाव, दूरदृष्टी आणि भाषेवर नियंत्रण यांसारखे गुण राजकारणात येतांना अंगी असायला हवे. राजकारणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकस्तरावर काम करावे लागेल.
धर्म-जातींचे राजकारण करून, क्षणिक फायदा घेता येईल. मात्र, आपल्याला माणसाला माणसांशी जोडणारे राजकारण करायचे आहे. द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवून काम करायचे आहे. समाजाचा विचार करून, काम कराल तर मोठे नेते व्हाल. स्वत:चा विचार करून वाटचाल करून, नेते होता येणार नाही.