राहुल नार्वेकरांनी स्विकारला अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा

Maharashtra Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा चर्चा केली आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
https://pbs.twimg.com/media/GGHt1byXYAE2W-d?format=jpg&name=900×900

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पत्रामध्ये याबाबतचा तपशील समोर आला आहे. त्यामध्ये अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीसोबतच काँग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत आणखी काही नेत्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्यासोबत आणखी काही नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.