रियलमी सी ५३ स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। रियलमी कंपनीने ग्राहकांसाठी नेहमीच स्मार्टफोन लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी रियलमी कंपनीने आपला रियलमी सी ५३ हा स्मार्टफोन नवीन फीचर्ससह लाँच केला हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोन बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

रिअलमीच्या हा नवीन स्मार्टफोन ड्युअल सिम (नॅनो), अँड्रॉइड १३ आधारित Realme UI T वर चालतो. यामध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९० एच झेड  इतका आहे. हा फोन १.८२ जीएचझेड पीक फ्रिक्वेन्सीसह ऑक्टा कोअर १२ nm चिपसेटद्वारे समर्थित आहे. तसेच यात ६ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि ARM Mali-G57 GPU सह जोडण्यात आले आहे. यामध्ये १२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. रिअलमीने हा फोन चॅम्पियन गोल्डन आणि चॅम्पियन ब्लॅक या दोन रंगांमध्ये ऑफर केला आहे.

Realme C53 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये १०८ मेगापिक्सल AI समर्थित प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. १०८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळवणारा हा सेगमेंटचा पहिला हँडसेट असल्याचा दावा केला जात आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच यात १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे २ टीबी पर्यंत वाढवता येते. Realme C53 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, GPS/AGPS, Wi-Fi, Bluetooth 5, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.

या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी असणार आहे. रिअलमी सी ३ ची किंमत १०,९९९ रुपये आहे. हा फोन रिअलमी.कॉम आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. याची विक्री २० सप्टेंबरपासून दुपारी १२ वाजता सुरु होणार असून रियलमी सी ५३ च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे.