रील्स बनवण्याच्या नादात रेल्वेसमोर उभा राहून कॅमेरा हातात धरला; अन आयुष्याला मुकला

तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। सोशल मीडियावर अनेक जण सक्रिय असतो. आपले फॉलोवर्स खूप असावेत असं अनेकांना वाटत असत. त्यासाठी प्रयत्न देखील केला जातो. सद्या स्थितीत रिल्स बनवण्याचे प्रमाण ही खूप वाढले आहेत. या रील्स बनवण्याच्या नादात कितेय्क जणांनी आपला जीव देखील गमावला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली असून रील्स बनवण्याच्या नादात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

सूत्रानुसार, उत्तर प्रदेशात एक अल्पवयीन मुलगा रेल्वे रुळांवर उभा राहून रील बनवत होता. मात्र तेव्ढ्यात मागून वेगाने आलेल्या ट्रेनची त्याला जोरदार  धडक बसली आणि तो दूर फेकला गेला. फहमान असे मृताचे नाव असून तो अवघ्या 14 वर्षांचा होता. अवघ्या काही लाईक्ससाठी त्याने त्याचं लाखमोलाचं आयुष्य गमावलं. लाल रंगाचा शर्ट आणि जीन्स घातलेला फहमान हा रुळाच्या दिशेने चालत जाऊन पुढे उभा राहिला. दुसरा माणूस त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मागून ट्रेन येत होती तरी फहमान रुळाजवळून हलला नाही. वेगाने आलेल्या ट्रेनची फहमानला जोरात धडक बसली.

ट्रेनची धडक बसून कित्येक फूट दूर उडून खाली कोसळलेला फहमान हा जागीच ठार झाला. या दुर्दैवी आणि तितक्याच दुःखद घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.