तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। सद्या पावसाळा ऋतू सुरु आहे. उत्तर भारतातील सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. असे काही लोक आहेत जे आपत्तीतही मौजमजा करण्याची संधी शोधत आहेत. काही लोकांना पावसात भिजायला खूप आवडते. मात्र काहींना पावसात भिजणे मुळीच आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? कि पावसात भिजण्याचे बरेच फायदे आहेत. ते फायदे कोणते आहेत हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
पावसाच्या पाण्यात अशी अनेक खनिजे आढळतात, जी आपल्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये अल्कलाइन पीएफ असते, जे केस मजबूत करण्याचे काम करते. त्यामुळे केसांचा कोरडेपणाही दूर होतो. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि शरीरावर चिकटलेली घाण सहज निघते. पावसात आंघोळ केल्याने शरीरात सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात. हे हार्मोन्स तणाव आणि चिंता दूर करून तुम्हाला आनंदी बनवण्याचे काम करतात. याशिवाय मन आणि शरीरालाही खूप आराम वाटतो. जर तुम्हाला हार्मोनल असंतुलनाची समस्या असेल तर पावसात आंघोळ करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
पण तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे मोसमातील पहिल्या किंवा दुसऱ्या पावसात आंघोळ करू नये. कारण ते खूप प्रदूषित आहे. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. पावसात जास्त वेळ अंघोळ करण्याची चूक करू नका. कारण आजारी पडण्याचा धोका असू शकतो.