रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्दर्न रिजन (RRC) ने तब्बल 4096 पदांवर भरती जाहीर केली आहे. दहावीसह आयटीआय पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी ही भरती होणार आहे.
विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाहीय. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
रेल्वेच्या या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये ITI/NCVT प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमधून पात्रतेशी संबंधित इतर तपशील तपासू शकतात.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 सप्टेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST आणि महिला उमेदवार विनामूल्य फॉर्म भरू शकतात.
निवड प्रक्रिया– उमेदवारांची निवड स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्टिंगद्वारे केली जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.