जळगाव । भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला भुसावळसह जळगावला थांबा असल्याने जळगावकरांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०११०१ पुणे-अमरावती एक्स्प्रेस शुक्रवार १० नोव्हेंबर ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुणे स्थानकावरून दररोज सकाळी ११:०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११०२ अमरावती-पुणे एक्स्प्रेस शनिवार, ११ नोव्हेंबर ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अमरावती स्थानकावरून दररोज रात्री १०:५५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.
या स्थानकांवर असेल थांबा?
अप व डाऊन मार्गावरच्या या गाड्यांना उरूळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, चाळीसगांव, काजगांव, पाचोरा, जळगांव , भुसावळ, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा स्थानकांवर थांबा असणार आहे. एलएचबी कोचसह धावणाऱ्या या विशेष रेल्वेला १७ डबे असून, द्वितीय श्रेणी चेयर कार १३, एसी चेयर कार श्रेणी ०१, स्लीपर श्रेणी ०१, द्वितीय श्रेणी व एसएलआर ०२ अशी संरचणा असणार आहे.