गर्भधारणेदरम्यान काम करणे अनेकदा कठीण असते. अनेक वेळा महिलांना इच्छा नसतानाही काम करावे लागते. या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ खूपच भावूक आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक ग्राहक हॉटोलमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिलेला चक्क १ लाख रुपये टिप देतो. हे पाहून महिला भावूक होऊन ग्राहकाला मिठी मारते. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचवेळी, लोक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला वेटर रेस्टॉरंटमध्ये जेवण देत असल्याचे दिसून येते. ती ग्राहकाशी बोलते. यानंतर ग्राहक एक नोटांचे बंडल महिला वेटरला देतो. महिला ते घेण्यास नकार देते. पण ग्राहक तिला जबरदस्ती पैसे देतो. हे पाहून ती खूप भावूक होते. यानंतर तिने ग्राहकाला मिठी मारली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
गुडन्यूज_मूव्हमेंट नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘असे हृदय असणारे खूप कमी लोक आहेत’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘या स्थितीत त्याने आराम करावा आणि काम करू नये.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनीही यावर कमेंट करत आपले मत व्यक्त केले आहे.
https://www.instagram.com/p/Cz9hW0wOrRm/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again