राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के तिकिटाची सवलत दिली आहे. यामुळे महिलांमध्ये कमालीचा आनंद असून एसटीत महिला राजच सुरु झाल्याचे दिसत आहे. महिलांना प्रवासात अर्धे तिकीट आकारले जात असतानाच ६५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठांनाही प्रवासात अर्ध्या तिकिटाची सोय दिली आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आता ज्येष्ठांनाही अर्ध्या तिकिटाचा लाभ मिळत आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्यात आल्याने त्यांची संख्या बसमध्ये वाढली आहे. तसेच महामंडळाने ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, एसटी प्रवासात शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही प्रवासी बनावट आधारकार्ड दाखवून एसटीची दिशाभूल करत असल्याचे प्रकरण उघडकीस येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सवलतधारक प्रवाशांना बसमध्ये प्रवास करताना ओरिजनल आधारकार्ड बाळगावे लागणार आहे. ओरिजनल आधारकार्ड नसेल तर मोफत प्रवास विसरावा लागेल.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात ७५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय असून, त्यांना आधार कार्ड दाखवावे लागते, याचा गैरफायदा घेत काही जणांनी वय वाढवून बनावट आधार कार्ड तयार केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता ओरिजनल आधार कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
एसटीच्या प्रवासात महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत दिली जाते. याशिवाय ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. एकीकडे महामंडळाकडून प्रवाशांना सवलती दिल्या जात असताना दुसरीकडे या सवलतींचा लाभ घेण्यासाठी काही महाभाग बनावट आधार कार्ड तयार करून सवलतींचा बेकायदेशीर लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आधार कार्डमध्ये वय वाढवून घेऊन ५० टक्के किंवा मोफत प्रवासाची सवलत लाटली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे महामंडळाने आता ओरिजनल आधार कार्ड असल्याशिवाय सवलतीचा लाभ दिला जाणार नसल्याचे पत्रक जारी केले आहे. आता डुप्लिकेट आधार कार्ड, ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
बसमध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी सोबत आधार कार्डची मूळ प्रत बाळगणे आवश्यक आहे. कोणी बनावट आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे नंदुरबार आगाराचे व्यवस्थापक संदीप निकम यांनी सांगितले.