लग्नसराईत आनंदाची बातमी! सोने स्वस्त झाले, पहा आताचे दर

मुंबई । सोन्या आणि चांदीच्या किमतीत दररोज बदल होतात. सणोत्सवानंतर देशात लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्यासह चांदीच्या दरांनी विक्रमी उच्चांक नोंदवला. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र मागील गेल्या काही सत्रात दोन्ही दरात घसरण दिसून आली. त्यांनतर आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून आली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज ११ डिसेंबर रोजी सकाळी फेब्रुवारी २०२४ सोन्याचे फ्युचर्स मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ६१,६५० रुपयांवर तर मार्च २०२४ चांदीचे वायदे ७२,३२५ रुपयांवर व्यवहार करत होते.

तर सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची सरासरी किंमत ६२,३५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्यासाठी त्याच प्रमाणात खरेदीसाठी ५७,१५० रुपये मोजावे लागतील. दरम्यान, चांदीचा भाव ७६,००० रुपये प्रति किलो ग्रॅमवर स्थिरावला आहे.

सोन्याच्या किमती या कारणांवर अवलंबून असतात
सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होईल.