लग्नाचे आमिष; तब्बल एक वर्ष अत्याचार, तरुणाबाबत सत्य कळताच तरुणी हादरली

Crime News : देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एका दलित तरुणीवर तब्बल एक वर्ष अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अर्शद याने पीडितेवर लग्न करण्याचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेशाच्या अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरातील आहे. अर्शद गेल्या एक वर्षापासून लग्नाच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार करत होता. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी आरोपी पीडितेला मुबारकपूर भागात असलेल्या ओयो हॉटोलमध्ये घेऊन गेला.

त्यानंतर तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणी स्थानिक महाविद्यालयात बीएससी तिसर्‍या सेमिस्टरची विद्यार्थिनी आहे. दरम्यान, पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी अर्शदला अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.