---Advertisement---

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

---Advertisement---

धुळे : बदलापूर, सिन्नर तालुक्यामधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना समोर आली आहे. देवपुरातील एका अपार्टमेंटमध्ये तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ७ मार्च २०२४ पासून संशयित आरोपी जयेश खूमासिंग ठाकुर (३८ रा. नर्मदेश्वर महादेव मंदिराजवळ, रासयोनी नगर, जळगाव) या संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून देवपुरातील एका अपार्टमेंटमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment