---Advertisement---

लग्नाचे आमिष : पळवून नेत वेळोवेळी अत्याचार, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

---Advertisement---

नंदुरबार : लग्नाचे आमिष दाखवून एकाने फूस लावून पळवून नेत २४ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर तिला व तिच्या बहिणीला ठार मारण्याचीही धमकी दिली.

यामुळे आलेल्या निराशेत तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तेलखेडी, ता. धडगाव येथे घडली. या प्रकरणी युवकाविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

भाईदास बोडक्या पाडवी (३२) रा. तेलखेडी-अठेरीपाडा, ता. धडगाव असे संशयिताचे नाव आहे. पाडवी याने तालुक्यातीलच एका २४ वर्षीय तरुणीला काही दिवसांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले होते.

या दरम्यान त्याने तरुणीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. तसेच तिच्या बहिणीला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून आणि नैराश्येत जाऊन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येस भाईदास पाडवी हाच जबाबदार असल्याची फिर्याद तरुणीच्या पालकांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment