अलीगढच्या हरदुआगंज परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे ११ वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने महिला तांत्रिकाकडे गेली. मात्र तांत्रिकाने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा करून आरोपी तांत्रिकाला अटक केली आहे.
वास्तविक, पीडित महिलेला अनेक वर्षांपासून मूल होत नव्हते. मूल होण्याच्या उपचारासाठी महिलेला ओळखीच्या व्यक्तीने कथित तांत्रिकाकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. पीडित महिला तिच्या उपचारासाठी कथित तांत्रिकाकडे गेली होती, त्यावेळी आरोपीने कथित तांत्रिक उपचाराच्या बहाण्याने महिलेला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. सध्या पोलिसांनी कथित तांत्रिकाला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.