हैदराबाद येथील एका तरुणाचे लग्न ठरल्याने दातांची शस्त्रक्रिया करायला गेला, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. १६ फेब्रुवारी रोजी, हैदराबादच्या जुबली हिल्स येथील एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये ‘स्माइल डिझायनिंग’ प्रक्रियेदरम्यान 28 वर्षीय लक्ष्मी नारायण विंजम यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ॲनेस्थेशियाच्या अतिसेवनामुळे लक्ष्मी नारायण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. जेव्हा लक्ष्मी बेशुद्ध झाला तेव्हा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या वडिलांना बोलावले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लक्ष्मी नारायण यांनी त्याच्या कुटुंबीयांना शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली नाही. त्याला कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. यामुळे त्याच्या अकाली निधनासाठी वडिलांनी क्लिनिकला जबाबदार धरले आहे.