जळगाव : शहरात लग्न सोहळ्यातून साडेतीन लाखांचे दागिने चोरटयांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील कालिंकामाता मंदिराजवळील हॉटेल कमल पॅराडाईजमधील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रात्री मनोज कोळी यांच्या पत्नीकडे वधूचे दागिने आणि रोकड, असा एकूण तीन लाख ५४ हजारांचा मुद्देमाल असलेली पर्स होती. फोटोसेशन सुरू असताना पैसे व दागिन्यांची पर्स वधू-वरांच्या सोप्यावर ठेवली होती.
पाहुण्यांशी बोलत असताना अल्पवयीन मुलाने सोप्यावरील पर्स चोरून नेली. पुढे गेल्यावर त्याच्यासोबत एक तरुणही होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पर्सचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, काहीही माहिती मिळाली नाही.
अखेर त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता, त्यात अल्पवयीन मुलाने सोप्यावरील दागिन्यांची पर्स घेऊन तरुणासोबत पसार झाला. याबाबत मनोज कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.