ललित पाटील प्रकरण! फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर सतत ताशेरे ओढण्याचे काम सुरू होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात कंत्राटी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली. हे संपूर्ण पाप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सरकारचं आहे. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर, यावेळी बोलताना फडणवीसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटिल प्रकरणावरही मोठा गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ललित पाटील याला 10 नोव्हेंबर 2020 ला अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला नाशिक शिवसेनेचे प्रमुख केले होते. अटक झाल्यावर पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली. ती 14 दिवस मिळाली. त्यांनी लगेच ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोर्टात आम्ही चौकशी केली नाही, असा अर्ज सुद्धा केला नाही. किंवा पुन्हा कोठडी सुद्धा मागितली नाही. गुन्हेगाराची साधी चौकशी सुद्धा झाली नाही. कोणी दबाव आणला? मुख्यमंत्री की गृहमंत्री? आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. पण आज सांगणार नाही.” असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.