मुंबई : शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, असं भाकीत आमदार रवी राणा यांनी केलं आहे.दादांच्या भेटीमुळे पवार ९९% कन्वेन्स़ झाले आहेत. असंही ते म्हणाले. दि. १० नोव्हें. रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यानंतर अजित पवार पुण्याहून दिल्लीच्या दिशेला रवाना झाले. अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती आहे.
रवी राणा म्हणाले, “शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील. दादांच्या भेटीमुळे पवार ९९% कन्वेन्स़ झाले आहेत. मी आधीच सांगितलं होतं, दिवाळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो. मी आधीच दसरा सणाच्या वेळी सांगितलं होतं की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. दिवाळीच्या आधी मोठा फटका फुटू शकतो किंवा दिवळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो. अजित पवार यांनी ज्या पद्धतीने शरद पवारांची भेट घेतली आहे, मला असं वाटतं की 99 टक्के शरद पवार कन्व्हेन्स झाले आहेत. आता थोडासा धक्का लागायला पाहिजे.”
“शरद पवार लवकरच नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. ते भाजप सरकारसोबत येतील. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष संपेल आणि मोठं ताकदवान सरकार या महाष्ट्रात उभं राहील. जे समीकरणं दिल्ली स्तरावर चालू आहेत, आजपर्यंत ज्या घटना झालेल्या आहेत त्या अचानक झालेल्या आहेत. अशाचप्रकारे शरद पवार सोबत आले तर सरकारला आणखी ताकद मिळेल. सक्षम मजबूत सरकार महाराष्ट्रात काम करेल.” असं रवी राणा म्हणाले.