लसणाच्या पातीचा ठेचा रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। सगळ्यांनाच जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवं असत. जसे कि लोणचं, चटणी वगरे पण नेहमी तोंडी लावायला लोणचे किंवा चटणी खायला बोर झालं असेल तर अशावेळी तुम्ही लसणाच्या पातीचा ठेचा बनवू शकता. लसणाच्या पातीचा ठेचा घरी कसा बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
लसणाची पाते, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथंबीर, लिंबाचा रस, चिमूटभर साखर.

कृती 
सर्वप्रथम, लसणाची पात निवडून घ्यावी. लसूण पात निवडून धुवून चिरून घ्यावी. यानंतर लसूण पात, हिरव्या मिरच्या, कोथंबीर, मीठ व साखर घालून मिक्सर मध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्यावेत. यानंतर लिंबाचा रस घालून परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या. तयार आहे लसणाच्या पातीचा ठेचा.