लाचार उद्धव ठाकरे गप्प; नितेश राणे असं का म्हणाले?

मुंबई : इस्रायल विरुद्ध हमास या सुरू झालेल्या युद्धाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही आता दिसू लागले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला समर्थन दिल आहे. पण काँग्रेसने या युद्धाबाबत घेतलेली भूमिका ही नक्कीच विचार करण्यास लावणारी आहे. नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत काँग्रेसने पॅलेस्टाईन समर्थनार्थ ठराव मंजूर केला. पॅलेस्टिनी लोकांची जमीन, सोशासन आणि अधिकार्यांना काँग्रेसने पाठिंबा असल्याचे म्हटले. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नितेश राणे म्हणाले, “कधी सनातन धर्माला शिव्या घालणार्या लोकांबरोबर काँग्रेस बसणार. आता दहशतवाद्यांना मदत करण्यामध्ये काँग्रेसनी त्यांच्या CWC बैठकीमध्ये ठराव केलेला आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतलेली नाही. जशी सनातन धर्माबद्दल भूमिका घेतली नाही तसं याही बद्दल हे सत्तेसाठी असलेला लाचार मतांसाठी असलेला लाचार उद्धव ठाकरे काही बोलणार नाही हे असं सरळ स्पष्ट आहे. जे निरपराध माणसं मारली गेलेली आहेत. आणि मारणारे जे त्यांना दहशतवादी आहे.”
“काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे जे दहशतवादी हल्ले झाले सव्वीस अकरा असेल किंवा अन्य जे दहशतवादी हल्ले झाले या सगळ्या गोष्टीला काँग्रेसचा अप्रत्यक्ष पद्धतीने कसा पाठिंबा असेल आणि काँग्रेसची मानसिकता काय होती? हे याचं प्रदर्शन करणार आहे. जेव्हा सनातन धर्माला विरोध झाला तेव्हा उद्धव ठाकरे काय बोलले नाहीत. चोवीस ते अठ्ठेचाळीस तास होत आलेले आहेत. आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतलेली नाही. संजय राजाराम राऊतनी मोठा स्पष्टीकरण देत होता, इतिहास सांगत होता आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारातून हे लोक कसे लांब गेलेले आहेत? दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा यांना नैतिक अधिकार का नाहीये? बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली हे लोकांनी कशी दिलीय? याचं उत्तम उदाहरण म्हणजे सनातन धर्म असो किंवा पॅलेस्टाईन संदर्भात काँग्रेसने घेतलेली भूमिका असो, दहशतवाद्यांबरोबर राहण्याची जे काँग्रेसची भूमिका असो आणि त्यांनाच लावून बसणारे उद्धव ठाकरे असो. या कुठल्याही गोष्टी बाळासाहेबांच्या विचाराच्या चौकटीमध्ये बसणारे नाहीत. हिंदुत्वाच्या विचाराच्या चौकटीत बसणारे नाहीत. म्हणून ह्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावण्याचा अधिकार नाही तुमची हिंमत असेल तर त्या काँग्रेसच्या नेत्यांना ठणकावून दाखवा.” असा इशाराच राणेंनी ठाकरेंना दिला आहे.
दांडिया, गरबा आयोजकांनी कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या…
सर्व दांडिया, गरबा आयोजकांनी त्यांच्या कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या जे मूर्ती पूजा मानत नाही त्यांना प्रवेश नको. असे नितेश राणेंनी म्हटलं आहे. दांडियामध्ये येणारे हिंदू असावे अशी सकल हिंदू समाजाची भावना आहे. याच काळात असंख्य लव्ह जिहादचे प्रकार होतात. जिथे जिथे गरबा होतील तिथे आधार कार्ड चेक करावे. जे आमच्या देवीची पूजा करत नाही त्यांना आतमध्ये जाऊ देऊ नये. ज्यांना धर्मांतर करून हिंदू धर्मात यायचे आहे त्यांना आम्ही आणू शकतो. दांडिया खेळायला येणार ते हिंदू असले पाहिजे. असे नितेश राणेंनी ठणकावून सांगितले आहे.