जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने भावासोबत अकोल्याकडे पायी निघालेल्या अल्पवयीन तरुणीला मालेगावातील संशयीताने दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याने मालेगावातील आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष 10 महिन्याची कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनावली.
अशी घडली होती घटना
19 मे 2020 रोजी कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यानंतर अल्पवयीन पीडीता आपल्या भावासोबत मुंबईहून अकोला येथे जळगावमार्गे पायी जात असताना शहरातील कालिका माता मंदीर परीसरात जेवण वाटप सुरू असतांना भावंडांनी जेवण करीत झाडाखाली आश्रय घेतला होता. यावेळी आरोपी गणेश सखाराम बांगर (32, मालेगाव, जि.वाशीम) हा दुचाकी घेवून आला व त्याने अकोला येथे जात असल्याचे सांगून दोघांना दुचाकीवर बसविले. त्यानंतर पोलीस असल्याचे सांगून तिच्या भावाला वाहनाखाली उतरवून पीडीत मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यानंतर जळगाव व जिल्हा न्यायालयाचे न्या.डी.वाय.काळे यांच्या न्यायालयात खटला चालला.
यांची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्यात नऊ जणांच् या साक्ष नोंदवण्यात आल्या. त्यात पीडीता मुलगी, तिचा भाऊ आणि तपासाधिकारी गजानन राठोड यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी गणेश बांगर याला दोषी ठरत एक वर्ष 10 महिन्याची साधी कारावासाची शिक्षा आणि 500 रूपयांचा दंड सुनावला. सरकारतर्फे अॅड.प्रदीप महाजन यांनी काम पाहिले.