लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा नंबर वन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा डंका जगभरात वाजतो आहे. जगप्रसिद्ध नेत्यांपैकी सर्वात प्रसिद्ध नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम क्रमांकावर आहेत. वर्ल्ड ऑफ स्टॅटेटिक्स या ट्विटर हँडलने सगळ्याच प्रसिद्ध नेत्यांची यादी पोस्ट केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानी आहेत. क्रमांक एकचे नेते म्हणून ७६ टक्के रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती देण्यात आली आहे. याआधी मॉर्निंग कंसल्टने ऑगस्ट २०२२ मध्येही अशाच पद्धतीचा एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच क्रमांक एकवर होते. ७५ टक्के रेटिंगसह त्यांना सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून पसंती दर्शवली होती.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ८९.५ मिलियन ऑफोअर्स आहेत. जगातले सर्वात लोकप्रिय नेते असा त्यांचा लौकिक आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटेटिक्स या ट्विटर हँडलने दिलेल्या माहितीनुसार ७६ टक्के लोकांनी मोदींना सर्वात लोकप्रिय नेते म्हणून पसंती दिली आहे. ७६ टक्के हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रेटिंग आहे. लोकप्रिय नेत्यांच्या यादीत जो बायडेन यांच्या लोकप्रियतेच्या रेटिंगचं प्रमाण ४० टक्के आहे. तर ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेचं रेटिंग प्रमाण ३१ टक्के आहे.

काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मन की बात करतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात रेडिओ हा आऊटडेटेड वाटत असला तरीही त्यावरुन मोदी संवाद साधतात. ही बाब अनेकांना भावली आहे त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. या माध्यमातून लोकांशी संवाद साधणं हे लोकांना भावलं आहे. प्रत्येक मन की बात हे भाषांतरित केलं जातं. ते राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक स्तरावर ऐकलं जातं.