नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एका डीजीपीसह सहा राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. याशिवाय आयोगाने बंगालच्या डीजीपीलाही हटवले आहे. निवडणूक आयोगाने (ECI) बृहन्मुंबई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवले आहे.
याशिवाय आयोगाने या राज्यांतील आणखी अनेक अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने काढून टाकले आहे. पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. याशिवाय बृहन्मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली आहे.