भुसावळ : भुसावळमधून मोठी बातमी समोर आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) मोठा धक्का बसला आहे. भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसांघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भुसावळ येथे नुकतेच भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाला महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली. यावेळी छोटे खानी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.