लोकसभा निवडणूक ! मतदानाच्या दिवशी कामगार, कर्मचाऱ्यांना फुल पगारी सुट्टीची मागणी

जळगाव : मतदानाच्या दिवशी कामगार, कर्मचाऱ्यांना फुल पगारी सुट्टी मिळावी, अशी मागणी भाजप कामगार मोर्चाने २९ रोजी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

कामगारांना (कंत्राटी) मतदानाच्या दिवशी केवळ मतदान करण्याकरीताच 1-2 तास रजा मिळते. पुन्हा कामावर हजर रहावे लागत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी महिला कामगार मोर्चा प्रदेश सचिव सुधा काबरा, कामगार मोर्चा प्रदेश सचिव कुमार सिरामे , भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनिल वाघ, भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस ॲड. महेश अंबिकार , डॉ.विकास पाटील आदी उपस्थित होते.