लोकसभा निवडणूक : रावेरपेक्षा जळगावमधील मतदानाचा टक्का कमी ; मतदानाची अंतिम टक्केवारी समोर

जळगाव । चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभेच्या मतदारसंघासाठी मतदान झाले असून यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातील मतदानाची अंतिम टक्केवारी समोर आली आहे. दरम्यान, रावेरपेक्षा जळगावमधील मतदानाचा टक्का कमी दिसून आला. जळगाव लोकसभा मतदारसंघात ५७.७० टक्के मतदानाची नोंद झालीय. तर रावेर लोकसभा मतदारसंघात ६३.०१ इतके मतदान झाले.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाच्या करण पवारांमध्येच मुख्य लढत आहे. तर रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसे आणि शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील आमनेसामने आहेत. दरमान, सोमवारी पार पडलेल्या लोकसभेच्या मतदानाची विधानसभा मतदारसंग्रनिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी आज सकाळी स्पष्ट झाली

जळगाव लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९४ हजार ०४६ मतदार असून यापैकी एकूण ११ लाख ५० हजार ५३६ मतदारांनी मतदान केलं. दुसरीकडे रावेरमध्ये १८ लाख २१ हजार ७५० मतदार या असून यापैकी ११ लाख ४७ हजार ९६५ मतदारांनी मतदान केलं. काल जिल्ह्यातील सार्वधिक कमी मतदान जळगाव शहरात ५२.९० टक्के इतका झाले. तर सार्वधिक मतदान रावेरमध्ये ६७.७७ टक्के इतके झाले.

जळगाव लोकसभा मतदारसंघ
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ – ५२.९०%
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – ६२.६०%
अमळनेर विधानसभा मतदारसंघ – ५५.९४%
एरंडोल विधानसभा मतदारसंघ – ६१.७६%
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –५५.०१%
पाचोरा विधानसभा मतदारसंघ – ५९.८२%

रावेर लोकसभा मतदारसंघ
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
चोपडा विधानसभा मतदारसंघ – ६१.५२%
रावेर विधानसभा मतदारसंघ –६७.७७%
भुसावळ विधानसभा मतदारसंघ –५७.३३ %
जामनेर विधानसभा मतदारसंघ – ६०.१८%
मुक्ताईनगर Programs मतदारसंघ – ६४.५६ %
मलकापुर विधानसभा मतदारसंघ – ६७.३६ %