कडू महाजन
धरणगाव : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजु लागले असून राजकीय पक्षाची प्रचार व प्रसाराची पुर्व तयारीस प्रारंभ झाला आहे.
13 मे रोजी राज्यातील चौथ्या टप्प्यात होत असलेल्या जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार असून भाजपा आघाडीने दहा ते बारा दिवस अगोदरच उमेदवारी जाहीर करुन प्रचारात आघाडी घेत मतदारसंघात भेटी देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर न झाल्याने त्याचा तंबुत गोधळाची परिस्थीती दिसून येत आहे.
सद्या देशात राज्य पातळी पासून तर राष्ट्रीय पातळीवर पर्यंत भाजप (एनडीए) तर प्रतिस्पर्धी म्हणून कांग्रेसची इंडीया आघाडी असून राज्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. त्यात देशातील 96 कोटी पेक्षा अधिक मतदार आपल्या हक्काचा उमेदवारास निवडून देतील असे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.
सध्या जिल्ह्यातील भाजप आघाडीकडून जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ तर रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे या अनुभवी उमेदवार रिंगणात आहेत. दोघेही उमेदवारांना राजकीय वारसा असून आपल्या मतदारसंघातील जनतेचा मुलभूत समस्यांची जाणीव आहे.
जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ ह्या अनेक वर्षांपूर्वीच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत्या. त्या अनुषंगाने त्याना संपुर्ण जिल्ह्यातील व तळागाळापर्यंत कामाचा अनुभव आहे तर त्याचे पती स्वर्गिय उदय बापु वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष पासुन तर प्रदेश पदाधिकारी म्हणुन त्यांच्याकडे जवाबदारी होती त्या अनुषंगानेच स्मिता वाघ यांचे स्वर्गिय उदय बापुचा राजकीय व सामाजिक कार्यात मोठा सहभाग होतो त्या अमळनेर तालुक्यातील असल्या तरी त्याचा जिल्ह्यातील विवीध विकास कामात त्याचे कार्यकर्त्यांचे मोठे संघटन उभे केले असल्याने प्रचारात त्याना वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांची हमखास विजयाची खात्री दिली जात आहे.
तर रावेर मतदारसंघाचे रक्षा खडसे यांनी मतदारसंघात दोन वेळा निवडून आल्याने त्यांचे संपुर्ण मतदारसंघात अनेक कामे केली आहेत तर त्या एकनाथ खडसे (नाथाभाऊ) च्या सुन असल्याने त्यांची ओळख आहे. आज नाथाभाऊ राष्ट्रवादीचे आमदार किवा नेते असले तरी भाजपामध्ये नाथाभाऊंचे मोठे योगदान आहे ते युतीचा राज्यात पाटबंधारे मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री असताना सामान्य जनतेची अनेक कामे केली असल्याचे नाकारता येणार नाहीत ते रक्षाताई साठी जमेची बाजु असुन ते विजयाची हॅटट्रिक साधणार असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.
जनतेचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास
ना खाऊंगा और ना खाने दुंगा… आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना हटवविण्या साठी कांग्रेससह इंडीया आघाडीचे 28 पक्ष एकत्र येऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले असले तरी मोदी सरकारने सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले असल्याचा दावा करून भ्रष्ट नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे. जिसने देश को लुटा है उनको लौटाना पडेगा ही मोदींची गॅरंटी लोकांचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिसून येत आहे. तसेच गेल्या दशकात मोदी सरकार ने दिलेल्या वचनपुर्ती इतिहास जनतेचा समोर खंबीरपणे सादर करुन सामान्य जनता मोदी वरच विश्वास व्यक्त करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
तर कोराना काळात देशातील जनेतेला थाली वाजणे, स्टार्च पेटवून आवाहन करीत प्रतिसाद दिल्याचा इतिहासातील घटनाक्रम पहाता देशातील जनतेचा मोदी सरकार वर विश्वास असल्याचे चित्र दिसून येत आहे. परीणामी मतदारसंघातील दोघे उमेदवार निवडून येण्याची गारंटी दिसुन येत आहे शेवटी चार जुन नंतरचा निकालावरच खरे चित्र अवलंबून राहील असा मतप्रवाह जनतेत दिसुन येत आहे.