मुंबई : लोकसभा – विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चेने देशात जोर धरला आहे. जर दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर प्रशासकीय खर्च वाढेल शिवाय याचा भाजपाला फायदाही होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
लोकसभा- विधानसभा निवडणूका एकत्र होणार असल्याच्या चर्चेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मला विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता वाटत नाही. आणि का व्हाव्यात? लोकसभेनंतर पुढे सहा-साडेसहा महिने वाचतात. निवडणूका एकत्र होण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे मी तरी म्हणेन की लोकसभा विधानसभा निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता दिसत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.